एक पाऊल क्रांतीच्या दिशेने...🚩
शिव - फुले - शाहू, आंबेडकर आणि कर्मवीर आण्णांसारख्या अनेक महापूरुषांनी बहुजनांच्या शैक्षणिक विकासासाठी उपसलेल्या कष्टांची जाणीव ठेवून आणि मानवतावादी विचारधारेला साक्षी ठेऊन,11 एप्रिल 2020 महात्मा फुले यांच्या जयंती दिनी गोरगरिबांच्या लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठी social-100 फौंडेशन ची स्थापना झाली. संघटने सोबत वेगवेगळ्या 35 पेक्षा जास्त क्षेत्रात कार्यरत असलेले संपूर्ण महाराष्ट्रातून सभासद मंडळी जोडली गेली आहेत आणि त्यांचा आकडा हा एप्रिल 2023 च्या गणनेनुसार 700 पेक्षा जास्त असून या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संघटनेची नोंदणी जरी 17 सभासदांच्या नावे असली तरीहि पिलर्स ऑफ सोशल 1०० फौंडेशन हा एकूण 5० सभासदांचा ग्रुप आहे, जे सर्व सभासद SHF चे कामकाज पाहतात व वेग वेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतात.
महात्मा फुले म्हणतात,
"विद्येविना मती गेली,
मतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्तविना शुद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले".
शिक्षणही मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे ह्या विचारांचा पुरस्कार करणारे....महात्मा फुले हे प्रथम भारतीय होते.महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगासमोर सर्व भारतीयांना सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची मागणी केली होती.
कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात, "माझ्या शाळेत एखादा महादजी शिंदे निर्माण होईल आणि तो या जमान्यात पुन्हा दिल्लीच्या तख्तावर जाईल".
नेल्सन मंडेला म्हणतात, "Education is most powerful weapon which you can use to change the world".
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मुले सुसंस्कृत होतात.शाळा म्हणजे सुसंस्कृत नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे".
महात्मा गांधी म्हणतात, "माणूस उभा करणे हा शिक्षणाचा पहिला उद्देश, तसाच चारित्र्याचा सर्वांगीण विकास साधणे हा शिक्षणाचा अंतिम उद्देश".
राजश्री शाहू महाराजांनी 21 सप्टेंबर 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला.
महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1892 साली शिक्षण सक्तीचे आणि मोफत मिळेल असा कायदा केला.
महापूरुषांच्या नजरेत व मानवी जीवनात शिक्षण हे अतिशय महत्वाचे गणले गेले आहे. शैक्षणिक प्रश्नांकडे वळण्यापूर्वी समाजातील विषमतेचे स्वरुप समजून घेऊ,
आज शिक्षण क्षेत्रामध्ये पावित्र्य, सचोटी आणि प्रामाणिक पणा हा काही अपवाद सोडल्यास जवळपास हद्दपार झाला आहे. मोठमोठ्या शैक्षणिक संस्था ह्या राजकारणी मंडळींकडून आणि बड्या, बड्या उद्योग व्यवसायीकांकडून चालवल्या जात आहेत.डोनशेन च्या नावाखाली काळ्या पैशांचा अक्षरश: महापूर येत असतो.साधारणपणे नव्वदच्या दशकात शिक्षणाच्या खाजगी करणाला सुरुवात झाली.2005 नंतर खाजगी संस्था ह्या प्रचंड प्रमाणात वाढल्या.शासनाने 6 ते 14 ह्या वयोगटात शिक्षण हक्क कायदा लागू करुन अनेक वर्ष झाली तरी आजही देशात 35 ते 40% मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच शाळा सोडत आहेत.महासत्तेच्या गप्पा मारणारे आम्ही....आज तरी देशातील 90% शाळांमध्ये इंटरनेट चे कनेक्शन नाही.10 ते 15% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था नाही.देशातील नव्वद हजार प्राथमिक शाळा ह्या एका वर्गात भरत आहेत.देशातील भटक्या जमातीतील जवळपास एक कोटी मुले ही शाळा व्यवस्थेच्याच बाहेर आहेत.फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर शाळा बाह्य मुलांची संख्या 8 ते 9 लाख आहे.शाळां मधिल विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण तर एवढे भयानक आहे की....100 मुले जर प्राथमिक शाळेत दाखल झाली तर उच्च शिक्षणा पर्यंत फक्त 20 विद्यार्थी पोहोचतात.पुणे, मुंबई, म्हणजे महाराष्ट्र आणि भारत नाही. गेल्या चार वर्षात देशात 26000 हुन अधिक विद्द्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक मुलांच्या शैक्षणिक वाटचालीतील आर्थिक आडचणींन मुळे अगदी मेटा कुटीला आलेले आहेत.बुद्धीमत्ता असुनही फक्त पैशा अभावी अनेक मुलं शिक्षणापासून वंचित रहात आहेत.शाळा सोडणा-या विद्द्यार्थ्यांतील जवळ-जवळ 50% विद्यार्थी हे आर्थिक अडचणीं मुळे शाळा सोडून देत आहेत.आज देशात 789 हुन अधिक विद्यापीठे आहेत.शांघाय रॅन्कींग नुसार जगातील उत्कृष्ठ 500 विद्यापीठांच्या क्रमवारीत चीनची 65 तर भारताचे फक्त 1 विद्यापीठ आहे.आजमितीला देशातील उच्च वर्गातील 7,50000 विद्यार्थी हे उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे. हि आहे देशातील सध्याची शैक्षणिक परिस्थिती.
नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञे अमर्त्य सेन म्हणतात, भारत सरकारने कमीत कमी जी डी पी च्या 6% खर्च हा शिक्षणावर केला पाहिजे.1965 - 66 साली कोठारी आयोगाने सरकारला असे सुचवले होते की,22 वर्षापर्यंत जर सर्वांना मोफत शिक्षण द्यावयाचे असेल तर जी डी पी च्या कमीतकमी 8% खर्च हा शिक्षणावर करावा लागेल.पण सरकारचे प्राधान्यक्रम वेगवेगळे आहेत.2012 - 13 साली भारतात शिक्षणावर जी डी पी च्या 3.1% खर्च केला होता.तोच खर्च 2017 - 18 साली 2.7 वर घसरला आहे.देशातील वाढलेला भ्रष्टाचार पाहता हा खर्च 1% पर्यंत येत असावा.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्हटले होते, एखाद्या योजनेसाठी दिल्ली मध्ये जर एक रुपयाची तरतूद केली तर यातील फक्त 15 पैसे त्या योजने पर्यंत येतात.1854 साली पुण्यात गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरींग कॉलेजची ( सी ओ ई पी ) स्थापना झाली.त्यानंतर आज पर्यंत पुण्यात आणि त्याच्या आसपास एक ही त्या तोडीचे इंजिनिअरींग चे काॅलेज सरकार उभे करु शकले नाही...नव्हे सरकारची मानसिकता ही नाही.यावरून सरकार चे शिक्षणातील धोरण लक्षात येते.आपण बजेटच्या फ्कत 1% खर्च विज्ञान शिक्षण व प्रसारासाठी करतो.खरतर तो खर्च ही वाढवायलाच हवा.अमेरिका आपल्या 22 पट खर्च करते आणि चीन 8% पट जास्त खर्च करते.त्यामुळे प्रयोग शाळांपासून ते संशोधनां पर्यंत सर्वच पातळीवर बोंबाबोंब आहे.त्याची परिणीती म्हणून भारतात दर 10 लाख लोकसंख्येच्या मागे शास्त्रज्ञांची संख्या ही फक्त 4 आहे अमेरिकेत ती 950 च्या दरम्यान आहे.तर जपान मध्ये 3750 आहे.135 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात विज्ञान विषयाला वाहिलेली फक्त 100 प्रकाशने आहेत.तर एकट्या अमेरिकेत 500 आहेत.हजारो वर्षाचा ईतिहास असल्याच्या बतावण्या करुन आम्ही आमच्या संस्कृतीच्या मोठ मोठ्या गप्पा मारतो.जर अमेरिकेचा ईतिहास शोधला तर मोजून 500 वर्षापर्यंत ही मागे जात नाही.पण आज अमेरिका कुठे आहे आणि आम्ही कुठे आहोत.
खरतर समाजशास्र असे सांगते की, तुम्ही करोडो रुपये कमवा पण तुम्ही तो पर्यंत सुरक्षित नसता जो पर्यंत तुमच्या आसपास कोणी उपाशी आहे.आज आपला देश गरीब आणि श्रीमंतीतील प्रचंड आशा दरीच्या उंबरठ्यावर उभा आहे.देशात प्रचंड विदारक आशी परिस्थिती आहे.देशातील देवस्थाने करोडो रुपये दाबून ठेवत आहेत. माणसात देव शोधणाऱ्या संतांची शिकवण आम्ही मात्र कधीच फाट्यावर मारली आहे.आम्ही म्हणतो एखाद्या कुटुंबाला जर रोज तूपरोटी खावयास मिळत असेल तर दुसऱ्या गरीब कुटुंबाला भाजी भाकरी तरी खायला मिळावी.ती भाजी भाकरी ही जर त्या गरीब कुटुंबाला खायला मिळत नसेल तर ते तूपरोटी खाणाऱ्यांची तूपरोटी हिसकावल्या शिवाय राहणार नाही.कारण उपाशी माणसापुढे जगातील कुठलेही नैतिकतेचे तत्वज्ञान चालत नाही.
सुदामा आणि कृष्णाच्या निरपेक्ष मैत्री च्या गोष्टी नेहमीच आम्हाला सांगितल्या जातात.ते दोघेही सांदिपणी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकले.त्यामुळे सुदामा समोर आला तेंव्हा कृष्णाने त्याला लगेच ओळखले.ते दोघे गरीब आणि श्रीमंतीतही एकमेकांचे दुख आणि आनंद ओळखण्यास सक्षम होते.कारण ते एकत्र वाढले होते.सध्याचा सुदामा शिकत आहे आश्रम शाळेत व कृष्ण शिकत आहे इंटरनॅशनल स्कूल मध्ये.सध्याच्या कृष्णाच्या डोक्याला सुदाम्याच्या आडी आडचणी शिवतही नाहीत...नव्हे त्या माहितीच नाहीत सध्याचा सुदामा कृष्णा कडे त्याच्या पायाशी लोळन घेणार्या ऐश्वर्या कडे फक्त अचंबित होऊन पाहात आहे.उद्या इंटरनॅशनल स्कूल मधील कृष्णा कलेक्टर झाला तरीही त्याला सुदाम्याच्या आडचणी मात्र काही समजणार नाहीत.
बांधवांनो 1818 च्या अगोदर बहुजन समाजाला शिक्षणालाच बंदी होती.अगदी स्वातंत्र्य पूर्व भारतात म्हणजे अगदी 1890 च्या दरम्यान देशातील 90%खेड्यातून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा ही अस्तित्वात नव्ह्त्या.
फक्त कल्पना करा !.....महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, महर्षी आण्णासाहेब कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, ह्या मंडळींनी स्वताच्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक हाल अपेष्ठांचा विचार ही न करता ह्या महामानवांनी बहुजणांसाठी स्वताला गाडूण घेतले.
ह्या महामानवांनी बहुजणांच्या शिक्षणासाठींचे कार्यच केले नसते तर.....?
आजचे शिक्षण सम्राट म्हशींच्या शेपट्या मोडत बसले असते आणि गावोगावी एकरावरुन गुंठ्यावर आलेल्या समाजाचे कुत्र्यागत हाल नक्कीच झाले असते.
टोकाची विषमता आणि तिला लागलेली फळे म्हणजे....शिक्षणाची ईच्छा असूनही शिक्षणापासून दूर जाताना दिसणारी हतबल गरीबी.
वि.स.खांडेकर यांच एक वाक्य आठवते....ज्या करुणेचे रुपांतर कृतीत होत नाही ती करुणा वांझ असते. खरतर पेटणाऱ्या वणव्यात घागरभर पाणी ही न टाकता त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणे हा आमचा स्वभाव नाही.
आणि या सर्वांवर आम्ही आमच्या परीने शोधलेला पर्याय म्हणजेच social – 100 foundation
वरील विदारक परिस्थितीची जाण आणि भान ठेऊन तुम्ही तुमच्या उत्पन्नातील दरमहा रुपये फक्त 100 आपल्याच गोरगरिब बांधवांच्या शिक्षणासाठी खर्च करु शकत असाल तर तुम्ही फक्त एकच करा....social - 100 foundation मध्ये सहभागी होऊन व्हाट्स अॅप ग्रप मध्ये सहभागी व्हा.आम्ही.....तुम्ही सामाजिक कृतज्ञता निधी म्हणूनन दिलेले दान हे अगदी निप:क्ष पणे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गोरगरिबांच्या लेकरांपर्य॔त पोहोचवू आणि भारताला ए पी जे अब्दुल कलामांच्या स्वपनातील महासत्ते कडे घेऊन जाऊ.
होय हे आपणच करायला हवे...
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाची जाणीव म्हणून....!
राजर्षी शाहू महाराजांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून.....!
कर्मवीर भाऊरावांची आठवण आणि लक्ष्मीबाईंचे स्मरण म्हणून........!
महर्षी आण्णासाहेब कर्वे व बाबासाहेब आंबेडकर यांचे
ऋण म्हणून......!
देशाची भावी पिढी सक्षम व्हावी म्हणून आणि समाजाचे स्वास्थ्य अबाधित रहावे म्हणून.....!
आपले,
Social-100
Foundation
समाजाकडून-समाजासाठी