नमस्कार...
प्रथम सर्वांना तिसऱ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
"पाऊले चालती" हे दोन शब्द माणसांच्या जीवनाचे सार आहेत. एक शब्द एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. असाच आपला सोशल 100 फौंडेशन चा प्रवास अविरत, निरंतर, कधीही न संपणारा असणार आहे.
खरं तर या सोशल 100 फौंडेशन मी श्री. योगेश सरपाले सर यांच्या मुळे जोडले गेले आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आपण समाजात राहतो आणि या समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना प्रत्येक व्यक्तीने जोपासायला हवी आहे, आणि याच समाजाचे ऋण फेडण्याची एक सुवर्णसंधी मला सोशल 100 फौंडेशन मार्फत मिळाली आहे.
सोशल 100 फौंडेशनच्या माध्यमातून गोरगरिब मुलांच्या शिक्षणासाठी थोडासा हातभार लावणे हे आपल्या सर्वांनाच शक्य झाले आहे. ज्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली त्या सर्व मुलांनी आपल्या प्रतिक्रिया ग्रुप वर पाठवल्यात. किती सुंदर लेखन केलंय त्यांनी आणि बरीच मुले यातून आपली स्वतःची गुणवत्ता पण सिद्ध करत आहेत. हेच आपल्या कामाचे चीज आहे.
श्री. संतोष चोरघे सर यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि श्री. सुधीर खुटवड सरांचा प्रत्येक महिन्याचा मिळणारा पारदर्शक हिशेब अगदी कौतुकास्पद आहे.
मी या संघटनेशी जोडली गेलेली आहे, हे मी माझं भाग्य समजते आणि माझ्या हातून घडणारी ही समाजसेवा अशीच सोशल 100 फौंडेशन माध्यमातून घडतं राहिलं.