एक पाऊल क्रांतीच्या दिशेने...🚩
शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्यायावर आधारलेली, जात , धर्म, प्रांताच्या पलिकडे गेलेली विषमता विरहीत समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे
व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या 250 हुन अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी सोशल १०० फाऊँडेशन शिष्यवृत्ती देणे.शिक्षणाची प्रचंड आस असणारा महाराष्ट्रातील कुठलाही विद्यार्थी शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणार नाही असा विश्वास तळागाळातील विद्यार्थ्यांप्रती निर्माण करणारे व्यासपीठ तयार करणे.
सामाजिकतेची जाण आणि भान असणारे, नैतिकतेने नोकरी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे, मानवतावादी विचारांवर भरोसा असणारे, मानवतावादी विचार समर्थन करणारे, कोणत्याही जाती, धर्म, प्रांताचे कट्टर नसलेले 5००० सदस्य संघटनेबरोबर जोडणे.