संघटनेचे कार्य कसे चालते
- होम
- संघटनेचे कार्य कसे चालते
- संघटनेबरोबर सभासद जोडण्याचा निकष : आपल्या उदरनिर्वाहासाठी नैतिकतेने पैसे कमावणारी कुठलीही व्यक्ती संघटनेची सभासद होऊ शकते. संघटनेच्या कर्यात सहभागी होऊ शकते.
- सोशल 1०० फाऊँडेशनचे कार्यक्षेत्र : संघटना फक्त शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि संघटना सध्या सभासदाच्या संख्येअभावी फक्त पुणे जिल्हयातच कार्यरत आहे.
- संघटनेच्या कार्यासाठी आर्थिक निधी कसा उभारला जातो : संघटनेबरोबर जोडला गेलेला प्रत्येक सभासद दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेला संघटनेच्या बँक अकाउँटवरती सामाजिक कृतज्ञता निधी म्हणून रुपये 1००/- पाठवत असतात. प्रत्येक सभासदाला संघटनेकडे दर महिन्याला जमा होणाऱ्या एकूण सामाजिक कृतज्ञता निधीचा बँक स्टेटमेंटसह हिशोब पाठवला जातो.
Social-100 foundation साठी तुम्ही देत असलेल्या देणगीरुपी योगदानाचे पुढे काय होणार आहे?
- उद्दिष्ट : गोरगरिबांच्या लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठी मदत करणे.
- विनियोग : social-100 foundation मध्ये दर महिना जमा होणा-या निधीचा विनियोग हा अगदी 200% गोरगरिबांच्या लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठीच खर्च केला जाईल.
- मदतीसाठीचे कार्यक्षेत्र : सध्या मदतीसाठीचे कार्यक्षेत्र फक्त पुणे जिल्हा असेल.
- निकष : गरज आणि गुणवत्ता हाच एकमेव निकष असेल.
- मोफत : शिष्यवृत्ती साठी कोणतीही फॉर्म फी घेतली जात नाही
- निवड : social-100 foundation व्यवथापनाने एक निवड समिती तयार केली आहे. सदर निवड समिती आलेल्या अर्जांतुन विद्यार्थ्यांची निवड करेल.निवड करताना समिती लिंग, जात, धर्म पाहणार नाही.समिती फक्त गरज आणि गुणवत्ता पाहूनच विद्यार्थ्यांची निवड करेल.
- अर्ज कसा करावा : social-100 foundation ने विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या स्काॅलरशीप साठी एक अर्ज डेव्हलप केलेला आहे,तो अर्ज भरुन द्यावा लागेल.
- अर्ज भरण्याची तारीख काय असेल : 5 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज मिळेल
- निवड कधी केली जाईल : 1 नोव्हेंबर ते 15 च्या दरम्यान निवड समिती आलेल्या अर्जांतुन छाननी करुन विद्यार्थ्यांची निवड करेल.
- स्काॅलरशीप कधी दिली जाईल : नोव्हेंबर ते डिसेंबर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्काॅलरशीप दिली जाईल.
- शिष्यवृत्ती फक्त चेक स्वरूपातच दिली जाईल.
- शिष्यवृत्ती चेक हा विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थेच्या नावाने दिला जाईल.
- संघटनेतील सभासद आपल्या आसपास असणा-या होतकरू, हुशार आणि गरजवंत विद्यार्थ्यांचा अर्ज संघटने पर्यंत अवर्जून पोहोचऊ शकता.पण मदत त्यालाच मिळाली पाहिजे असा आग्रह धरु नका.विद्यार्थ्यांची निवड करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हे फक्त निवड समितीलाच राहिल.
(तुमच्या सुचना संघटनेच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी मौल्यवान असतील )