गरिबी बरोबर दोन हात करत शिक्षण घेऊन, नोकरी- व्यवसायात असलेल्या गोरगरिबांच्या लेकरांनी ,गोरगरिबांच्याच लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठी, कर्तव्याच्या भावनेतून उभी केलेली चळवळ म्हणजे सोशल १०० फौंडेशन.
नमस्कार,
मी रविना रोहिदास रेणुसे. मी MBA च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. मला वडिल नाहीत, माझी आई शेती करते. मला काल Social 100 ची Scholarship मिळाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत गगनभरारी घ्यायची स्वप्न पाहणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही काल स्कॉलरशिप देऊन आमच्या स्वप्नाना पंख देण्याच काम केलत. आम्ही आता नव्या उमेदीने आमच्या स्वप्नांचा दिशेने भरारी घेऊ. आणि तुम्ही जशी आम्हाला मदत देऊ केली, आमच शिक्षण पूर्ण झाल्यावर तशीच मदत इतरांना करण्याचा प्रयत्न करू, आम्ही देखील या प्रवाहाचा भाग बनू. तुम्ही देऊ केलेल्या मदतीमुळे माझी कालेज ची fees भरण्यास मदत झाली.
मी संपूर्ण Social 100 team ची खूप आभारी आहे. Thank you so much.
माझे नाव जुनियद जानुमियाँ तांबोळी.
मी सध्या बीई इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या कोर्समध्ये सेकंड इयरला आहे फर्स्ट इयरला असताना माझे ॲडमिशन कॅप थ्रू नव सह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या कॉलेजला झाले.
माझी आई ही नव सह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे हाउसकीपिंग काम करते आणि वडील हे भारत पेट्रोल पंप या ठिकाणी वर्कर आहेत.
परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण घेणे थोडे कठीणच वाटले परंतु social 100 foundation यांनी हा प्रवास खूप सोपं केले या आपल्या social 100 चे मी नेहमीच ऋणी राहील आणि भविष्यात या आपल्या social 100 सोबत येऊन नक्कीच समाजातील परिस्तिथी नसल्यामुळे शिकु न शकणा्रया मुलांची नक्कीच साथ देईल अशी मी ग्वाही देतो.
Thank you social-100.....!!!!!
नमस्कार मी आसावरी रेणुसे, सर्वात प्रथम मला social 100 foundation चे आणि त्यातिल सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानयचे आहेत व तुम्ही माझी या शिषवृत्तीसाठी निवड केली त्या बद्दल खरच मी तुमची ऋणी आहे.खर तर एक प्रकारे तुम्ही मुलांना आर्थिक मदत तर केलीच आहे पण मानसिक तणावातून देखील बाहेर काढले आहे. आता मानसिक तणाव म्हणजे नक्की काय तर घरातल्या पैशांच्या आडचणी आसुदेत किंवा घरात चालु असलेले आजार आता माझ्या वडिलांना Dialysis चालू आहे. ते घरीच असतात मग आई घर चालवते.खुप depression आल होत सर तेव्हा आस वाटल होत आता सगळच संपल आता काय होणार पण हळू हळू नीट होत गेल आता वडिल ठिक आहेत.तेव्हा पासुन आपण पण आपली फी स्वतः भरावी आई वडिलांना त्रास नको.अश्यात social 100 foundation एक आशेचा किरण म्हणून भेटली मला खरच मी खुप खुप आभारी आहे तुम्ही मला मदत केली व मी याची नेहमी जाणिव ठेवील भविष्यात मी चांगल्या नोकरीला लागल्यावर मी ही social 100 foundation च्या मार्फत तुमच्या सोबत गरिब मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करेल.आपले foundation खुप मोठे व्हावे व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे हिच स्वामींकडे प्रार्थना आहे.
नमस्कार, मी महेश दत्तात्रय पालवे. मी engineering च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मला वडिल नाहीत, माझी आई एका छोट्या कंपनी मधे मशीन वर काम करते. मला काल Social 100 ची Scholarship मिळाली. आमच्यासारख्या गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तुम्ही काल स्कॉलरशिप देऊन आम्हाला support केल आहे . या बद्दल मी मनापासून तुमचा ऋणी राहील. आणि तुम्ही जशी आम्हाला मदत केली, तशीच मदत मी इतरांना नक्की करेल .तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझी कालेज ची fees भरण्यास मदत झाली. मी संपूर्ण Social 100 team चा मनापासून आभारी आहे.
आज social 100फौंडेशन तर्फे माझी गुणवत्ता व परिस्थिती पाहून मला माझ्या LLB शिक्षणासाठी आदरणीय मार्गदर्शक राष्ट्रपती पदक सन्मानीत श्री दत्तात्रय वारे गुरुजींच्या हस्ते scholarship मिळाली .माझ्या आईवडिलांची पुण्याई माझ्या 2 मुलींचे प्रेम व माझे सासू सासरे व पती यांच्या पाठिंब्यामुळे मी आज शिक्षण घेऊ शकतीये .समाजात माझ्या कुटुंबासारखा जर पुढाकार प्रत्येक कुटुंबाने घेतला तर नक्कीच खूप महिला घडतील ,शिक्षण घेऊन नक्कीच मोठया हुद्द्यावर पोहचतील .मी स्वतःला भाग्यवान समजते की मी social100सारख्या team च्या संपर्कात आले .माझ्यावर social 100 टीमचे एक ऋण आहे असे मी समजते व ते फेडण्याची मी नक्कीच खात्री देते. लवकरच Social 100ची एक सदस्या होईल अशी आशा बाळगते.
Social 100फौंडेशन चे मनापासून आभार
मनापासून आभार social 100 team मी स्वतः च्या पायावर उभे राहून आपल्या फौंडेशन ला त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचन्यास नक्कीच माझा खारी चा वाटा असेल
नमस्कार, मी अवंतिका दिपक बोऱ्हाडे मी BHMS च्या पहिल्या वर्गात शिकत आहे. आज social 100फौंडेशन तर्फे माझी गुणवत्ता व परिस्थिती पाहून मला माझ्या BHMS साठी scholership दिल्याबद्दल मी तुमचे खूप ऋणी आहे. तुम्ही जे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी महान कार्य करत आहात त्यामध्ये आपल्या संस्थेची उत्तोरात्त प्रगती होवो. तुमच्या या कार्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळेल व शिक्षणासाठी मदत होईल तुमच्या या scholership मुले माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे. आपण हे जे कार्य करत आहात त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्या विद्यार्थ्यांची आर्थिक पारिस्थी व गुणवत्ता पाहून आपण त्यांना मदत करत आहात .
अनेक संस्था अशा प्रकारचे कार्य करत असतील पण तुमचे कार्य हे वाखाण्या सारखे आहे. तुम्ही ही जी scholeship दिली आहे यातून मी माझ्या आयष्याचे सोने करेल जेव्हा मी माझ्या पायावर उभी राहील तेव्हा नक्कीच मी संस्थेचा वारसा पुढे नेण्यात खारीचा वाटा उचलेल. तुमच्या या कार्याला माझा सलाम व पूनाच्छ एकदा आपले खूप खूप आभार...!!!
सर्वांना तृतीय वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा
सोशल 100 फौंडेशन च्या सर्व सभासदांनी अनेक गोर गरिबांची मुले शोधली व त्यांना आर्थिक सहाय्य केले. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी शिक्षण खूप महत्वाची गोष्ट आहे आणी ह्यात विद्यार्थाना पुढे घेऊन जाण्याचे कार्य सोशल 100 फौंडेशनने केले आहे. मी त्यांचे खरच खूप मनापासून आभार मानते, त्यांनी मला व अनेक गोर गरिबांना खूप मदत केली आहे. मी सर्वांची कायमच ऋणी राहीन.
तुम्ही जे कार्य केल ते आजकाल खूप कमी लोक करतात. तुम्ही मिळून एक संस्था निर्माण केली आणी त्यात मला सुद्धा सामील केले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!
पुढे जाऊन मी ही ह्या संस्थेत सामील होऊन गोर गरिबांना मदत करेल, असे मी आश्वासन देते व तुम्ही मला ह्याचा भाग करून घेताल अशी आशा बाळगते. पुन्हा एकदा सोशल 100 फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा..! तुमचे कार्य खरच खूप महान आहे. सोशल 100 फौंडेशनच्या जोडलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन व आभार..!
"सर्वांत प्रथम सोशल 100 फौंडेशन मधील सर्व सभासदांना आणि सोशल 100 फौंडेशन मधील सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
काही वर्षांनी इतिहासात या तारखेची नोंद ठेवली जाईल असा हा आजचा दिवस. सोशल 100 फौंडेशन ही केवळ एक संघटना नसून ती एक चळवळ आहे. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याला असामान्यतेचा धडा शिकवत स्वतःच्या भवितव्यासाठी सतत तेवत राहायला प्रवृत्त करणारी ही चळवळ नक्कीच माझ्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरत आहे.
आजच्या या धावपळीच्या युगात जेव्हा लोकांना एकमेकांकडे पाहायला देखील वेळ नाही अशा वेळी नराचे नारायणात रूपांतर करून भावी पिढीसाठी ज्ञानाची गंगा सतत प्रवाही ठेवण्यासाठी सतत परिश्रम करत असणाऱ्या संघटनेच्या सर्व सभासदांना माझा मानाचा मुजरा !!!
आजच्या या भव्य आणि दिव्य अशा दिनी मी मनापासून ग्वाही देते की संघटनेने आमच्या प्रती दाखवलेले प्रेम आणि आमच्याकडून असलेल्या अपेक्षा नक्कीच पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. खरंच माझं भाग्य म्हणावं की मी सोशल 100 फौंडेशन बरोबर जोडली गेली आहे म्हणूनच म्हणावं वाटतं,
"गुमनामी के अंधेरे में थी पहाचान बना दिया
दुनिया के गम से मुझे रुबरू करा दिया
इनकी ऐसी कृपा हुई, मुझे एक होनहार साथ ही साथ एक अच्छा इंसान बना दिया !!!"
खरंच सोशल 100 फौंडेशन ची मी मनापासून आभारी आहे आज मी जी काही आहे ती फक्त सोशल 100 फौंडेशन मुळेच. आजच्या या वर्धापनदिनी मी प्रार्थना करते की संघटनेचे हे काम वर्षानुवर्षे असच चालु राहो आणि येणाऱ्या काळात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातातून याला अधिकाधिक प्रतिसाद मिळत राहो. सोशल 100 फौंडेशन मधील सर्व सभासदांना आठवलं की एक चारोळी आपोआप ओठांवर रेंगाळते,
थोर असे हे कार्य ज्यांचे
डोळे भरून पाहा जरा
आपण ही व्हावे त्यांच्यासम
हाची सापडे ध्यास खरा !!!
Social 100 foundation Pune - समानतेच्या वाटेवरती एक समान राहू शाहू फुले आंबेडकर यांना मानवंदना देऊ छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी माझे विचार मांडतो ज्या काळी गोरगरीब किंवा बहुजन समाजातील मुलांना शिक्षण नाकारले जायचे त्या काळात थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी सर्वांना शिक्षण देण्याचे काम केले शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा त्यासाठी त्यांनी एकजुटता करून मुलांना शिक्षण देण्याचे काम अविरतपणे चालू ठेवले आणि त्याचाच वारसा घेऊन सोशल हंड्रेड फाउंडेशन माझ्यासारख्या अनेक गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत आहेत. मला आपल्या कुटुंबाबद्दल (संस्थेबद्दल )माझ्या कॉलेजमधील मित्रांनी सांगितले आणि मी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर मी सरांना कॉल केला सरांना सांगितले की सर मी सतीश मस्के कर्वे येते एम एस डब्ल्यू शिकत आहे आणि मला आई वडील नसल्याने माझा सांभाळ हा माझ्या आजीने केला आहे आणि तिचे वय आता जास्त झाल्याने ती इतरत्र कोणाच्या शेतात कामाला जाऊ शकत नाही आणि माझे शिक्षण पूर्ण होईल किंवा माझ्या ऍडमिशनची फिस देईल अशी तिची ताकद नाही आणि सरांना या गोष्टी सांगितल्यानंतर सरांनी सर्व टीमशी बोलून मला स्कॉलरशिप दिली आणि माझे ॲडमिशन झालं तसेच वारंवार सर मॅडम व सर्वजण संपर्कात असतात आणि माझ्या अडचणी विचारतात अगदी पाच-सहा दिवसापूर्वी मला बस पासची अडचण होती तर त्यासाठी सरांनी प्रयत्न केले आणि आपल्या संस्थेतील मॅडम यांनी मला बस पास साठी दरमहा आठशे रुपये देत आहेत जेव्हा माझ्यासारखा कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणाचे ध्येय ठेवतो आणि याला तुमच्यासारख्या महान मार्गदर्शकाचा आणि विचारवंताचा या काळात आधार भेटतो तर मला वाटत नाही की माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पैसे अभावी अपूर्ण राहील मी या सोशल हंड्रेड फाउंडेशन सी जोडलो गेलो ते माझे भाग्य समजतो धन्यवाद.
नमस्कार 'सोशल 100 फाऊंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त आभार व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही मला शिष्यवृत्तीच्या पात्र समजले, आम्हाला करिअरची खडतर वाट समाजाच्या दातृत्वातून सुखकर करण्याची संधी तुम्ही निर्माण करून दिली. संकटाच्या काळात आमच्या मदतीला धावून आलात. तुमच्या पुढाकाराने मी भावी शिक्षण पूर्ण करू शकेन. ही मदत व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्या भविष्याला एक आशेचा किरण आणि भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे. आमच्या गरजेच्या काळात तुमच्याकडुन मिळालेलं पाठबळ अमुल्य आहे. तुम्ही केलेल्या मदतीमुळे गोरगरिबांच्या मुलांमध्ये शिक्षण घेण्यासाठी नवी उमेद मिळत आहे. पैशाअभावी शिक्षणापासुन दुरावत चाललेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आपण करीत आहात. यातुनच ग्रामीण भागातील मुलांप्रती येत असलेली बांधिलकी आणि कणव नजरेस येते. मी पणाच्या असंवेदनशील आणि आयुष्य जगण्यासाठी स्पर्धेच्या युगात तुम्ही आपण समाजात राहतांना समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही कर्तव्यभावना जोपासली. मनात आलेला विचार कृतीत उतरवणारेच समाजसेवक असतात. संघटनेबरोबर जोडला गेलेला प्रत्येक माणसाने अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपल स्थान संघर्ष करून, शिक्षण घेऊन समाजात बनविले आहे. याच सर्व लोकांना आदर्श ठेवुन मी भविष्यातील माझी वाटचाल करेल. मी माझं भाग्य समजते, की मला सोशल 100 फाउंडेशनचे भाग होता आले. आणि मी भविष्यामध्ये सोशल 100 फौंडेशनच्या या विचारांना पुढे घेऊन जाईल.
सोशल 100 फौंडेशन सोबत जोडलेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.