शिष्यवृत्ती २०२४-२०२५ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

एक पाऊल क्रांतीच्या दिशेने...🚩

Follow us:

शिष्यवृत्ती निकष

  • होम
  • शिष्यवृत्ती निकष

शिष्यवृत्ती निकष

  • सोशल 1०० फाउंडेशन स्कॉलरशिप ही फक्त पुणे जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठीच आहे.
  • इतर जिल्ह्यातील (सातारा, सोलापूर, नाशिक, अहिल्या नगर) फक्त अनाथ विद्यार्थ्यांसाठीच आहे
  • स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड ही संघटनेच्या तज्ञ निवड समितीकडून विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि गुणवत्ता या निकषांवर केली जाते.
    आर्थिक परिस्थिती : 6०%
    गुणवत्ता : 4०% असे विभाजन केलेले असते.
  • निवड समितीकडून विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाते तसेच होम व्हिजीट देखील केली जाते.
  • अर्जा बरोबर कोणाचीही शिफारस असल्यास अर्ज स्विकारला जात नाही.
  • संघटनेच्या प्रतिनिधींना कोणीही कुठल्याही विद्यार्थ्यांची फोन करून शिफारस केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा अर्ज बाद केला जातो.
  • सोशल 100 फाउंडेशन स्कॉलरशिप का नाकारली गेली हे कुणालाही संघटनेकडून कळवले जात नाही.
  • स्कॉलरशिप देण्याचा संपूर्ण अधिकार निवड समितीला राहील.
  • एकदा सोशल 100 फाउंडेशन स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्याला पुढील वर्षी स्कॉलरशिप मिळेलच असे नाही. पुढील वर्षी तो विद्यार्थी अर्ज करू शकतो मात्र त्याची निवड ही पुर्णत: त्याच्या गुणवत्तेवर आधारित केली जाईल.
  • सदर स्कॉलरशिप 10वी, 12 वी, बीए (BA)., बी एस सी(BSC)., बी.कॉम(BCOM) या पारंपारिक पदवी धारकांसाठी दिली जाणार नाही.
  • सदर स्कॉलरशिप फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दिली जाणार आहे. उदाहरणार्थ अभियांत्रिकी ( डिग्री, डिप्लोमा ) होमियोपॅथी, MBBS, आयुर्वेद, नर्सिंग, B Pharm, D Farm, MSW, BCA, MCA, MCM, MBA, LLB हॉटेल व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम.

शिष्यवृत्ती वेळापत्रक

प्रत्येक वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान अर्ज मागविले जातात. शिष्यवृत्तीचे वेळपत्रक हे सरकारच्या अनेक शैक्षणिक निर्णयावर अवलंबून असते. पर्यायाने वेळापत्रकात बदल होऊ शकतो. या संदर्भातील सर्व माहिती हि वेबसाईट वर वेळो वेळी टाकली जाईल. या दरम्यान कृपया वेबसाईट वर भेट द्या.

शिष्यवृत्ती जाहीर कधी केली जाते ?

प्रतिवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान या महिन्यात शिष्यवृत्ती जाहीर केली जाते. या संदर्भातील सर्व माहिती हि वेबसाईट वर वेळो वेळी टाकली जाईल. या दरम्यान कृपया वेबसाईट वर भेट द्या.