शिष्यवृत्ती २०२४-२०२५ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

एक पाऊल क्रांतीच्या दिशेने...🚩

Follow us:

सोशल 1०० फौंडेशन सदैव तुमच्या सोबत

  • होम
  • सोशल 1०० फौंडेशन सदैव तुमच्या सोबत

" खरंतर मनुष्य जन्माची चाहूल आपल्याला काही महिने अगोदर लागते. पण मृत्यू हा बहुतेक वेळा अचानकच उभा ठाकतो. मृत्यू हे जरी अंतिम सत्य असले, तो कोणालाही चुकणार नसला, तरीही तो जर अकाली आला, कुटुंबाच्या अनेक जबाबदा-या शिरावर असताना एखाद्या कुटुंबातील कर्त्या माणसाला घेऊन गेला, तर त्याच्या कुटुंबाची प्रचंड वाताहात होत असते. ' सरणावर आणि तोरणावर ' भेटणा-या समाजाच्या भावनेचा पहिला उमाळा संपला, की काही अपवाद सोडता नाती - गोती, भावकी - गावकी, सर्वांची पांगापांग होते. मग उरतात ती पावलोपावली फक्त जगण्याची धडपड करणारी घरातील लेकरं - बाळं. त्या लेकराबाळांसह कुटूंबीयांच्या वाट्याला केविलवाणी हतबलता येते. या सर्व भयानक असणा-या पण तरीही सत्य असणा-या वास्तवाचा विचार करुन Social-100 Foundation ने असे ठरवले आहे की, संघटने बरोबर जोडल्या गेलेल्या कुठल्याही कमवत्या सभासदाचा ( जी व्यक्ती कुटुंबाचा एकमेव आर्थिक स्रोत आहे आणि संघटनेमध्ये सहभागी आहे. ) अकाली मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील लेकरांच्या उच्च शिक्षणासाठी Social-100 foundation जास्तीत जास्त आर्थिक मदत करेल. ती मदत करताना ' गरज आणि गुणवत्ता ' हा इतर विद्यार्थ्यांसाठी असणारा निवडसमितीचा निकष संघटनेच्या सभासदांच्या शिक्षण घेणा-या लेकरांसाठी लावला जाणार नाही.

" ज्या आपल्या सहका-याने त्याच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ, आर्थिक योगदान संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठी दिले आहे. संघटनेवर विश्वास ठेऊन संघटनेमध्ये सहभागी झालेला आहे, ज्याने संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या लेकरांचे पालकत्व घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या लेकरांचे पालकत्व घेणे त्याच्या लेकरांच्या शिक्षणाची काळजी घेणे ही संघटनेची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी संघटना नक्कीच पार पाडेल.
संघटीत रहा सुरक्षित रहा...

" खरंतर मनुष्य जन्माची चाहूल आपल्याला काही महिने अगोदर लागते. पण मृत्यू हा बहुतेक वेळा अचानकच उभा ठाकतो. मृत्यू हे जरी अंतिम सत्य असले, तो कोणालाही चुकणार नसला, तरीही तो जर अकाली आला, कुटुंबाच्या अनेक जबाबदा-या शिरावर असताना एखाद्या कुटुंबातील कर्त्या माणसाला घेऊन गेला, तर त्याच्या कुटुंबाची प्रचंड वाताहात होत असते. ' सरणावर आणि तोरणावर ' भेटणा-या समाजाच्या भावनेचा पहिला उमाळा संपला, की काही अपवाद सोडता नाती - गोती, भावकी - गावकी, सर्वांची पांगापांग होते. मग उरतात ती पावलोपावली फक्त जगण्याची धडपड करणारी घरातील लेकरं - बाळं. त्या लेकराबाळांसह कुटूंबीयांच्या वाट्याला केविलवाणी हतबलता येते. या सर्व भयानक असणा-या पण तरीही सत्य असणा-या वास्तवाचा विचार करुन Social-100 Foundation ने असे ठरवले आहे की, संघटने बरोबर जोडल्या गेलेल्या कुठल्याही कमवत्या सभासदाचा ( जी व्यक्ती कुटुंबाचा एकमेव आर्थिक स्रोत आहे. आणि संघटनेमध्ये सहभागी आहे. ) अकाली मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील लेकरांच्या उच्च शिक्षणासाठी Social-100 foundation जास्तीत जास्त आर्थिक मदत करेल. ती मदत करताना ' गरज आणि गुणवत्ता ' हा इतर विद्यार्थ्यांसाठी असणारा निवडसमितीचा निकष संघटनेच्या सभासदांच्या शिक्षण घेणा-या लेकरांसाठी लावला जाणार नाही.

" ज्या आपल्या सहका-याने त्याच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ, आर्थिक योगदान संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या लेकरांच्या शैक्षणिक विकासासाठी दिले आहे. संघटनेवर विश्वास ठेऊन संघटनेमध्ये सहभागी झालेला आहे, ज्याने संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या लेकरांचे पालकत्व घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या लेकरांचे पालकत्व घेणे त्याच्या लेकरांच्या शिक्षणाची काळजी घेणे ही संघटनेची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी संघटना नक्कीच पार पाडेल.
संघटीत रहा सुरक्षित रहा...